Ad will apear here
Next
डाळींचा चिवडा
प्रातिनिधिक फोटो

चिवडा हा मुलांचा आवडता पदार्थ. सण-वार काळात तर घरात हमखास चिवडा असतो. मुलांचा हा आवडता पदार्थ आणखी वेगळ्या पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक बनवता आला तर..? यासाठीच आपण ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळेस पाहणार आहोत डाळींचा चिवडा...
...................

एकूणच चिवडा हा प्रत्येक घरात असणारा पदार्थ. परंतु आपण फार फार तर पोहे, चुरमुरे यांपासून चिवडा बनवतो. यामध्ये फार पौष्टिक असे काही नसते, शिवाय हा पदार्थ तसा पोटभरीचा होत नाही. मुलांच्या या आवडीच्या पदार्थात वेगळे काही नक्कीच करता येऊ शकेल. 

पोह्यांचा चिवडा बनवताना त्यात भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे व फुटाण्याचे डाळं, काजू-बदामही घालावेत. त्यामुळे पोषणमुल्ये वाढतात. डाळींचा चिवडा या पदार्थात दोन पदार्थ एकात मिसळणे म्हणजेच स्वतःसाठी काहीतरी करणे, हा आनंद मुलांना घेता येतो. शिवाय कोथिंबीर, पिवळ्या डाळी आणि पांढरा चिवडा हे सगळे रंग एकत्र आल्याने तो आकर्षकही दिसतो. 

साहित्य : 
जाड पोह्यांचा तळलेला चिवडा किंवा डाएट चिवडा – एक वाटी (हे दोन्ही चिवड्यांचे प्रकार पांढऱ्या रंगाचे असतात), भिजवलेली हरभरा डाळ – दीड चमचा, भिजवलेली मुग डाळ – दीड चमचा, ओले खोबरे – तीन चमचे, लिंबाचा रस – एक चमचा, तेल-हळद-हिंग-जिरे – फोडणीसाठी, शेव आणि कोथिंबीर – वरून पेरण्यासाठी, सजावटीसाठी  

कृती : 
- सर्वप्रथम एका कढईत एक चमचा तेल घालून त्यात भिजवलेल्या डाळी वाफवून घ्या. 
- कोरड्या वाटल्यास वरून एक पाण्याचा शिपका मारून त्यावर झाकण ठेऊन परत वाफ येऊ द्या.
- त्यांनतर त्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट घाला आणि गॅस बंद करा.
- या डाळी थंड झाल्यानंतर त्यात लिंबू पिळून कोथिंबीर व ओले खोबरे घालावे. 
- सर्व्ह करताना या डाळी आणि पोह्याचा चिवडा वेळेवर एकत्रित करून घ्यावा. 
- मुलांना डब्यात देतानाही या डाळी आणि चिवडा वेगळा द्यावा आणि वेळेवर तो एकत्र करून घेण्यास सांगावे. असे केल्याने शेव आणि चिवडा कुरकुरीत राहून तो जास्त चविष्ट लागतो. 

- आश्लेषा भागवत
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZPNBG
Similar Posts
डाळ साबुदाणा एक स्वादिष्ट घटक आणि स्टार्चचे गुणधर्म असलेल्या साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. आपल्याकडे केवळ उपवासाचा पदार्थ म्हणून खाल्ला जाणारा हा साबुदाणा इतर वेळेस फार खाण्यात येत नाही. म्हणूनच यावेळेस ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहणार आहोत डाळ साबुदाणा...
मिश्र डाळींचे वडे हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळ्या डाळी आणि विशेषतः कडधान्ये खाण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. याने शरीराचे उत्तम पोषण होते. मुलांना डब्यातही मग असेच काही चविष्ट आणि पौष्टिक देता आले तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत मिश्र डाळींचे वडे...
भाज्यांचा पौष्टिक खिमा आज पाहू या भाज्यांचा पौष्टिक खिमा...
पोळीचे पापड चाट मुलांना सतत नवीन काहीतरी खायला हवं असतं त्यांच्या आवडी-निवडी पूर्ण करताना जास्तीत जास्त घरी बनवलेले पदार्थ कसे उपयोगात आणता येतील हे पाहिले जाते. अगदी उरलेल्या पोळ्यांपासूनही नवीन काहीतरी बनवता येईल. अशीच एक रेसिपी पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी या सदरात या वेळी आपण पाहत आहोत, ती म्हणजे पोळीचे पापड चाट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language